माझे
जीवन गाणे…
माझे…जीवन
गाणे तू …
सप्तसुरांचे
बोल तू...
सतारीचा
झंकार तू...
व्हायोलीनची
आर्तता तू...
विणेतील
मधुर सूर ...
सूरांतील
ताण तू...
तबल्याचे
बोल तू...
पखवाजातील
भक्ती तू...
भक्तीतील
शक्ती तू...
माझ्या…
प्रगतीच्या
पावलांचे ठसे तू...
व्यक्तिमत्वाची
तकाकी तू...
उज्वल
भविष्याचा इंद्रधनुष्य तू...
माझा
रंग तू... रूप तू... पोत तू...
माझ्या
मनाचे भरजरी वस्त्र तू …
माझ्या…
आयुष्याची
वेल तू...
कलिका
तू... पाकळ्या तू...
परागातील
गंध तू...
फूल
तू...
परीपक्वतेचे
फळ तू...
माझ्या…
रोमारोमातील
कण तू...
श्वासामधला प्राण तू...
जाणीव
तू... नेणीव तू...
अनुभव
तू... अनुभूती तू...
माझा…
आनंद
तू...समाधान तू...
स्वप्नांची
पूर्ती तू...
अकार
तू... उकार तू...
मकार
तू...
मूर्तिमंत
आयुष्याची एक ठेव तू...
माझी…
स्फूर्ती
तू... उर्मी तू...
प्रेरणा
तू... चेतना तू...
आठवणींच्या
कोंदणातील हिरा तू...
जीवनाची
लय तू... ताल तू... गेयता तू...
माझे
जीवन गाणे तू...
सुभाषजिरंगे,मुंबई.
दि. 30-09-2013
दि. 30-09-2013